अनेक एकांकिका,मालिका,नाटक,सिनेमातून अभिनय साकारून ऋतुजा बागवेनं मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान बनवलय. तिच्या 'अनन्या' नाटकानं रेकॉर्ड केला आहे अन् त्यात तिनं साकारलेल्या भूमिकेनं प्रत्येक प्रेक्षकाला एक दर्जेदार कलाकृती पाहिल्याचा आनंद दिला आहे. ऋतुजा बागवे आता चर्चेत आहे ते तिच्या नवीन 'Respect' सिनेमामुळे. या सिनेमातील एका समलिंगी संबंधावर आधारित कथेत तिनं प्राजक्ता माळीसोबत काम केलं आहे. 'Respect'सिनेमाच्या निमित्तानं संवाद साधताना ऋतुजानं सकाळ पॉडकास्ट मुलाखतीत अनेक गोष्टींवर बेधडक वक्तव्य केली आहेत. #prajaktamali #rujutabagwe